Home क्रीडा ‘ढिंग एक्स्प्रेस’ हिमाने पटकावले पाचवे सुवर्णपदक

‘ढिंग एक्स्प्रेस’ हिमाने पटकावले पाचवे सुवर्णपदक

hima das
hima das

hima das
 

प्राग (वृत्तसंस्था) भारताची युवा धावपटू हिमा दास हिची सध्या सोनेरी दौड सुरू आहे. शनिवारी झेक प्रजासत्ताकमधील नोवे मेस्टोनाड मेटुजी ग्रां.प्री. स्पर्धेत हिमाने महिलांच्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत अव्वलस्थान पटकावत सुवर्णपदकावर नाव कोरले. हे हिमा दास हिचे गेल्या महिनाभरातील पाचवे सुवर्णपदक ठरले आहे.

‘ढिंग एक्स्प्रेस’ नावाने प्रसिद्ध असलेली भारताची स्टार धावपटू हिमा दास हिने चेक रिपब्लिक येथील मेटूजी ग्रँड प्रिक्स अॅथलेटिक्स स्पर्धेत महिलांच्या ४०० मीटरच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावले. हिमाने हे अंतर ५२.०९ सेकंदात पार केले. हिमाने या महिन्यात पटकावलेले हे पाचवे सुवर्ण आहे. हिमाने आपल्या ट्विटर अकाउंटवर फोटो शेअर करत ही माहिती दिली. हिमाने यापूर्वी २ जुलैला युरोपात, ७ जुलैला कुंटो अॅथलेटिक्स मीटमध्ये, १३ जुलैला चेक गणराज्यात आणि १७ जुलैला टाबोर ग्रँड प्रिक्समधील वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सुवर्ण पटकावले आहे.


Protected Content

Play sound