Home क्राईम पन्नास हजारांसाठी विवाहितेला शिवीगाळ व मारहाण !

पन्नास हजारांसाठी विवाहितेला शिवीगाळ व मारहाण !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील माहेर असलेल्या विवाहितेला रिक्षा घेण्यासाठी ५० हजारांची मागणी करत शिवीगाळ व मारहाण करून छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सासरी पाळधी येथील पतीसह सासरकडील मंडळींविरोधात मंगळवारी २८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील माहेर असलेल्या शितल भिकन कोळी वय २७ यांचा विवाह धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील भिकन विजय कोळी यांच्याशी रितीरिवाजानुसार झालेला आहे. दरम्यान, विवाहितेला माहेराहून रिक्षा घेण्यासाठी ५० हजार रूपये आणावे अशी मागणी तिचे पतीसह सासरच्या मंडळींनी केली. त्यावर विवाहितेने माहेराहून पैसे आणले नाही या रागातून तिला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात करण्यात आली. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या त्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार पती भिकन विजय कोळी, सासू सुनंदा विजय कोळी आणि माधुरी दिपक कोळी तिघे राहणार पाळधी ता. धरणगाव यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ चेतन पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound