जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात सुरू असलेल्या जिल्हास्तरीय आंतर शालेय १७ वर्षाखालील सुब्रोतो चषक फुटबॉल स्पर्धेत शिरसोलीच्या अनुभूती इंटरनॅशनल स्कूलने अंतिम सामन्यात सेंट अलॉयसिस स्कूल भुसावळचा चुरशीच्या लढतीत १-० ने पराभव केला.
आज सकाळी मुलांच्या झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अनुभूती स्कूलने पंकज ग्लोबल चोपडा २-० नेपराभव केला होता. तर सेंट अलॉयसिस हायस्कूलने सावखेडाच्या ब.गो.शानबाग ३-०ने पराभव केला होता. मुलींच्या १७ वर्षाखालील गटात एकूण आठ संघांचा सहभाग होता. त्यात अंतिम सामन्यात भुसावळच्या ताप्ती पब्लिक स्कूलने भुसावळच्याच उल्हास पाटील हायस्कूलचा अतिशय चुरशीच्या लढतीत २-० ने पराभव करीत १७ वर्षाआतील गटाचा सुब्रोतो चषक पटकविला. विजयी व उपविजयी संघाला व उत्कृष्ट खेळाडूस जळगाव जिल्हा फुटबॉल असो तर्फे ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. पारितोषिक वितरण समारंभ डॉ.अण्णासाहेब जी. डी.बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या क्रीडा संचालिका डॉ. अनिता कोल्हे पाटील, फुटबॉल असोसिएशनचे , कार्याध्यक्ष मोहम्मद आबीद, मनोज सुरवाडे,आमिर शेख यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी रविंद्र धर्माधिकारी, क्रीडा अधिकारी एम.के.पाटील, अब्दुल मोहसीन उपस्थित होते. स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूचा बहुमान अनुभूती हायस्कूलचा मुकुंद पोतदार तर मुलींमध्ये शितल साहनी ताप्ती पब्लिक स्कूल यांना
ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.प्रा.डॉ. अनिता कोल्हे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. सूत्रसंचलन प्रवीण ठाकरे तर आभार एम.के. पाटील यांनी मानले यांनी मानले.