Home Uncategorized महामार्गावर भरधाव लक्झरीने दोघांना उडविले; दोन सख्खे भाऊ गंभीर जखमी

महामार्गावर भरधाव लक्झरीने दोघांना उडविले; दोन सख्खे भाऊ गंभीर जखमी


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरापासून जवळ असलेल्या खोटे नगर जवळील राधीका हॉटेल जवळ दुचाकी दुरूस्ती करत असतांना भरधाव वेगाने येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोन सख्खे भाऊ हे गंभीररित्या जखमी झाल्याची घटना मंगळवारी १५ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता घडली आहे. या घटनेबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अद्याप कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील निमखेडी येथील रहिवाशी असलेले गणपत भिकन कुंभार (वय ३५) हा तरूण लहान भाऊ अर्जून भिकन कुंभार (वय २५) यांच्या सोबत मंगळवारी १५ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास निमखेडीकडून पिंप्राळा येथे जाण्यासाठी दुचाकीने निघाले होते. त्यावेळी हॉटेल राधिका समोर त्यांची दुचाकीची चैन उतरली होती. आणि अचानक त्यांची दुचाकी रस्त्यावर जागेवरच थांबली. तेवढ्यात त्यांच्या मागून येणारी खासगी लक्झरी बस क्रमांक (एमएच १९ सीवाय ८२२२) ने दोन्ही भावांना धडक दिली. या भीषण अपघातात गणपत आणि अर्जून हे दोन्ही भाऊ जखमी झाले. यातील गणपती यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला खासगी रूग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहे. तर अर्जून यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यानंतर लक्झरी हे तालुका पोलीसात जमा करण्यात आले आहे. या घटनेबाबत पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.


Protected Content

Play sound