Home Cities पारोळा भाजपा जळगाव पश्चिम महिला मोर्चा जिल्हा कार्यकारिणीच्या उपाध्यक्षपदी कविता चौधरी

भाजपा जळगाव पश्चिम महिला मोर्चा जिल्हा कार्यकारिणीच्या उपाध्यक्षपदी कविता चौधरी


पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टी जळगाव पश्चिम जिल्हा महिला मोर्चाची नवी जिल्हा कार्यकारिणी आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आली असून, पारोळा शहरातील सौ. कविता भागवत चौधरी यांची महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. या नव्या कार्यकारिणीमुळे जिल्हा स्तरावर महिलांना संघटनात्मकदृष्ट्या अधिक भक्कम प्रतिनिधित्व मिळेल, असा विश्वास पक्ष नेतृत्वाकडून व्यक्त केला जात आहे.

महिला मोर्चा जिल्हा कार्यकारिणीची ही निवड महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांच्या आदेशाने तर जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री ना. रक्षाताई खडसे, वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे. तसेच प्रदेश महामंत्री विजय चौधरी, विभागीय संघटन मंत्री रवी अनासपुरे, खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, आमदार सुरेश भोळे, आ. मंगेश चव्हाण आणि आ. अमोल जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया पार पडली.

जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या मान्यतेनुसार भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सौ. अ‍ॅड. कृतिका आफ्रे यांनी ही कार्यकारिणी अधिकृतपणे जाहीर केली. या कार्यकारिणीमध्ये विविध ठिकाणांहून प्रभावी महिला कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला असून, पक्षाच्या धोरणांचा प्रचार आणि महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने मोर्चाच्या कार्यात गती येईल, असे सांगण्यात येत आहे.

सौ. कविता चौधरी यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे पारोळा शहरासह संपूर्ण जळगाव पश्चिम जिल्ह्यातील महिला कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी यापूर्वी विविध सामाजिक आणि राजकीय उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतल्यामुळे ही निवड पक्षाच्या कामकाजाला अधिक बळकटी देणारी ठरेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.


Protected Content

Play sound