Home Cities जळगाव मोठी बातमी – जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर : जाणून घ्या अचूक...

मोठी बातमी – जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर : जाणून घ्या अचूक माहिती !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हा परिषदेच्या गटांसाठी आज नियोजन भवनात आयोजीत कार्यक्रमात आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यात अनेक मान्यवरांचे गट आरक्षीत झाल्यामुळे त्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले गेले आहे. तर काहींचे गट मात्र अबाधित राहिल्याचे दिसून आले.

आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असलेल्या नियोजन भवनात जिल्हा परिषदेच्या 68 जागांसाठी आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यात सर्वसाधारण ३१, नागरीकांचा मागास प्रवर्ग १८, अनुसुचीत जाती १३ आणि अनुसुचित जमाती ६ असे एकुण ६८ गटांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. असून या ५० टक्के आरक्षण (३४ जागा) महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. ते खालील प्रमाणे

नागरिकांचा मागास प्रवर्ग
पातोंडा, घोडेगाव, म्हसावद, शहापूर, म्हसवे, दहिवद, कासोदा, मेहुणबारे, शिरसोदे, टाकळी प्र.चा. पिंपळगाव बुद्रुक, विखरण, नाडगाव, पाळधी, पातोंडा, नेरी दिगर, भालोद, लिहे.

सर्वसाधारण प्रवर्गाकरिता
उंबरखेड, लोहटार, नगरदेवळा बुद्रुक, बांबरुड प्र.बो., बहाळ, तामसवाडी, शिरसमणी, मांडळ, गिरड, तळई, कळमसरे, पाळधी खुर्द, न्हावी प्र. यावल, लासुर, पहुरपेठ, गुढे, साळवा, कुसंबे खुर्द, तोंडापूर, कजगाव, बेटावद बुद्रुक, जानवे, रांजणगाव, हरताळे, शिरसोली प्र.न., कुन्हे प्र.न., शेलवड, साखळी, लोहारा, ऐनपूर, सायगाव.

अनुसूचित जमाती
विरवाडे, धानोरा प्र.अ., अडावद, घोडगाव, चहार्डी, हिंगोणे, किनगाव बुद्रुक, केऱ्हाळे बुद्रुक, चिनावल, कुर्ऱ्हे, कानळदा, आसोदा आणि पिंप्री खुर्द .

अनुसूचित जाती
वाघोड, निंभोरा बुद्रुक, वाघोदा बुद्रुक, अंतुर्ली, कंडारी आणि निंभोरा.


Protected Content

Play sound