Home क्राईम विहिरीत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ !

विहिरीत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ !

0
228


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील ममुराबाद शिवारातील विहिरीत अंदाजे ४५ वर्षीय अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार ११ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता समोर आला असून याबाबत जळगाव तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील ममुराबाद शिवारातील विरेंद्र छगन खडके यांच्या शेतातील विहिरीत शनिवारी ११ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता अंदाजे ४५ वर्षीय अनोळखी व्यक्तीचा पाण्यात तरंगतांना आढळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. यावेळी मृतदेह हा अत्यंत कुजलेल्या अवस्थेत होता. खासगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आला. यावेळी मयताची कोणतीही ओळख पटलेली नसून ओळख पटविण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रदीप राजपूत हे करीत आहे.


Protected Content

Play sound