रावेर, प्रतिनिधी | आदिवासी भागातील एका आश्रम शाळेकरीता विद्यार्थी मिळावे म्हणून तालुक्यातील एक शिक्षक मध्यप्रदेशात भ्रमण करत होता. याबाबतचे वृत्त “लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ने प्रसिद्ध करताच त्या आश्रम शाळेच्या मुख्यध्यापकाने विद्यार्थ्यांच्या शोधार्थ गेलेल्या शिक्षकासमोर सपशेल शरणागती पत्करून झालेला प्रकार बाहेर सांगू नको, अशी विनंती केली आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, सुमारे ४२ ते ४५ वय वर्षे वय असलेला शिक्षक तालुक्यातील एका आश्रम शाळेसाठी विद्यार्थांच्या शोधार्थ मध्य प्रदेशात गेला होता. त्याने मुख्याध्यापक विद्यार्थी आणण्यासाठी शिक्षकांना कसे टार्गेट देतात ? याची आपबीती प्रसिध्दी माध्यमांना सांगितली होती. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच मुख्याध्यापकाने त्या शिक्षकाला शरण जावून माफीनामा देवून या प्रकरणावर पडदा टाकला आहे. तरी प्रकल्प अधिका-यांनी यात लक्ष घालून या भागातील आश्रम शाळांमधील मध्य प्रदेशचे रहिवासी असलेले विद्यार्थी शोधावे आणि आदिवासी विभागाचे अनुदान लाटणा-यांवर कारवाई करावी. तसेच त्या विद्यार्थांना दाखले देणाऱ्या तलाठ्यांचाही शोध घेऊन कारवाई करावी, मागणी जनतेतुन करण्यात येत आहे.