पारोळा, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी : तालुक्यातील भोडणदिगर येथे शिक्षण सेवा सहयोग फाऊंडेशन पुणे, यांच्यातर्फे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे विद्यार्थ्यांना दप्तर किटचे वाटप करण्यात आले.

दप्तर किटचे वाटप गटशिक्षण अधिकारी विश्वासराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी भोंडणदिगर शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत पाटील, पोपटनगर शाळेचे मुख्याध्यापक संजय मराठे, चोरवड शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय चौधरी तसेच राहुल भोसले उपस्थित होते. वरील सर्व मान्यवरांच्या हस्ते शाळेतील सर्व मुलांना दप्तर किट वाटप करण्यात आले. हेमंत निकम यांनी शिक्षण सेवा सहयोग फाउंडेशनचे कार्य व महत्त्व सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजयराव पाटील ,निलेश पाटील, सुनिल पाटील, प्रतिभा रावतोळे, छाया भामरे यांनी परिश्रम घेतले. शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत पाटील यांनी आभार मानले.




