
यावल, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी : येथील नगर परिषदच्या २३ प्रभागाच्या प्रभाग निहाय आरक्षणाची सोडत नगर परिषदच्या सभागृहात प्रांत अधिकारी बबन काकडे यांच्या अध्यक्षेतेखाली पार पडली. यावेळी मुख्याधिकारी निशिकांत गवई व नगररचना विभागाच्या नुपूर फालक, पाणी पुरवठा विभागाच्या अनुराधा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यात १२ प्रभाग महिलांसाठी तर ११ प्रभाग पुरुषांकरिता राखीव करण्यात आले. यावल नगर परिषदच्या सभागृहात फैजपुर विभागाचे प्रांतधिकारी बबन काकडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला सर्व पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते
यावल नगर परिषदेच्या होणाऱ्या सार्वत्रीक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण काढण्यात आले. यात यावल नगर परिषदच्या २३ प्रभागांचे आरक्षण काढून जाहीर करण्यात आले. प्रभागनिहाय काढण्यात आलेले उमेदवारांचे आरक्षण हे पुढील प्रमाणे राहणार आहेत.
प्रभाग क्रमांक १ अनुसुचित जाती व सर्वसाधारण महिला , प्रभाग क्रमांक २ अनुसुचित जमाती व सर्वसाधारण महीला, प्रभाग क्रमांक३मध्ये ना.म .प्र. महीला व सर्वसाधारण , प्रभाग क्रमांक ४मध्ये अनुसुचित जाती महिला व सर्व साधारण, प्रभाग क्रमांक ५मध्ये ना.म.प्र.व सर्व साधारण महिला, प्रभाग क्रमांक६मध्ये ना .म . प्र . महिला व सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ७ करीता ना.म .प्र. महिला व साधारण,प्रभाग क्रमांक८साठी सर्व साधारण महिला व सर्वसाधारण साठी राखीव असणार आहेत त्याच प्रमाणे प्रभाग क्रमांक ९मध्ये सर्वसाधारण महीला व सर्वसाधारण, प्रभाग१०मध्ये ना.म. प्र. व सर्वसाधारण महीला तर प्रभाग क्रमांक ११मध्ये अनुसुचित जमाती महिला व ना.म.प्र.आणि सर्वसाधारण महीला करीता आरक्षीत करण्यात आले आहे.



