भुसावळ – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टी भुसावळ व्यापारी आघाडीच्या वतीने आज शहरातील बालाजी मंदिर सभागृहात व्यापाऱ्यांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून वस्तू व सेवा कर (GST) मध्ये करण्यात आलेल्या सवलतींचा लाभ स्थानिक व्यापाऱ्यांना कसा होऊ शकतो, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. कार्यक्रमात राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे, प्रा. डॉ. निखील वायकोळे आणि भाजप जिल्हाध्यक्ष मार्गदर्शक चंद्रकांत बावीस्कर यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सहभाग घेतला.
या कार्यक्रमात ना. संजय सावकारे यांनी बोलताना सांगितले की, जीएसटी सुधारणा ही केंद्र सरकारची व्यापारी हिताची भूमिका स्पष्ट करणारी पावले आहेत. या निर्णयामुळे लघु व मध्यम उद्योजक, किरकोळ व्यापारी आणि पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या घटकांना दिलासा मिळेल. त्यांनी सांगितले की, मोदी सरकारने अनेक व्यापारी हिताचे निर्णय घेतले असून, त्या धोरणांची अंमलबजावणी ही राज्य व स्थानिक स्तरावर प्रभावी होणे आवश्यक आहे.

प्रा. डॉ. निखील वायकोळे यांनी कर प्रणालीतील तांत्रिक बदल, सुलभीकरण आणि जीएसटी रिटर्न प्रक्रियेतील सुधारणा याबाबत माहिती दिली. तर चंद्रकांत बावीस्कर यांनी व्यापाऱ्यांनी बदलत्या कर प्रणालीचा स्वीकार करत नव्या युगात प्रवेश करावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ना. संजय सावकारे होते. या मंचावर मनोज बियाणी, जिल्हा सरचिटणीस केतकी पाटील, परिक्षित बर्हाटे, युवराज लोणारी, संदीप सुरवाडे, किरण कोलते यांच्यासह भुसावळ उत्तर-दक्षिण भाजपचे शहराध्यक्ष ऋषभसिंह राजपूत व मोंटू अग्रवाल, शहर सरचिटणीस पवन बुंदेल, सागर चौधरी, जयंत माहूरकर, खुशाल जोशी, प्रविण इखनकर, नगरसेवक पिंटू कोठारी व पिंटू ठाकूर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
तसेच कार्यक्रमात प्रा. दिनेश राठी, अशोक नागराणी, अजय नागराणी, निक्की बत्रा, सुजित भोळे, श्रेयश इंगळे, पराग भोळे, विनीत पाटील, बापू महाजन, गोलू राणे, अनिरुद्ध कुलकर्णी, हरीश हुद्दार, चेतन जैन, गोपीसिंग राजपूत, राजू खरारे, राजेश अग्रवाल, धीरज पाटील सर, दीपक टेकवाणी, विशाल शाह, योगेंद्र हरणे, अमोल महाजन, रमाशंकर दुंबे आदी व्यापारी बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात जीएसटी कायद्यातील अलीकडील सुधारणा, त्यांच्या अंमलबजावणीतील अडचणी आणि त्यावर उपाय याविषयी खुल्या चर्चाही झाल्या.



