यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । : मागील नऊ दिवसांपासून आगमन झालेल्या दुर्गा देवीला वाजतगाजत निरोप देण्यात आला. यावल शहरातील ४३ तर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामीण भागातील ९ गावातील २४अशा ६७ सार्वजनिक व खाजगी दुर्गोत्सव मंडळाकडून शुक्रवारी रात्री नवदुर्गेस पारंपारिक वाद्य वृंदाच्या गजरात बेधुंद नृत्य करीत युवा वर्गाने निरोप दिला आहे.
काल शुक्रवारी (३ ऑक्टोबर) रोजी सायंकाळ पासून शहरातील विविध भागातून मोठ्या उत्साहात व शांततेच्या वातावरणात देवी विसर्जन मिरवणुकांना सुरवात झाली. रात्री उशिरापर्यंत नवदुर्गाचे विसर्जन करण्यात आले. यावलच्या तहसीलदार मोहमाला नाझीरकर,फैजपूर विभागीय पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे व त्यांचे सर्व सहकारी आणि गृहरक्षक दलाच्या बांधवांनी चोख बंदोबस्त ठेवला.

शहरातील ४३ दुर्गोत्सव मंडळांनी नवदुर्गोत्सव मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरा केला. या सार्वजनिक मंडळांसह यावल तालुक्यातील किनगाव ९ ,चितोडा ४,नायगाव ५, कोरपावली १,चिंचोली १, बोरावल खुर्द १, सावखेडा २, पांढरीवस्ती मोहराळे १ अशा६७ मंडळांनी नवरात्री उत्सवाची शुक्रवारी उत्साहात सांगता केली. विसर्जन वेळेत करावे या संदर्भात पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी शांतता समिती व मंडळांसाठी आयोजित शांतता समिती च्या बैठकीत आवाहन यापूर्वीच केले होते.
विसर्जन मिरवणुकी दरम्यान शांतता समिती सदस्य,विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले. शहरासह ग्रामीण भागात कुठे ही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही.
नवरात्री उत्सव काळात उत्साहात आई दुर्गेची आराधाना,पुजा,गरबा,दांडीया उत्साहात पार पडली विसर्जन शांततेत व उत्साहात व्हावे यासाठी येथील पोलीस ठाण्याच्या वतीने मंडळाचे पदाधिकारी शांतता कमिटी सदस्य व संबंधित प्रशासन यांची संयुक्त बैठक घेण्यात आल्या होत्या.



