Home धर्म-समाज मुक्ताईनगरमध्ये प्रथमच जगदंबा मातेचे आगमन, भाविकांमध्ये उत्सहाचे वातावरण

मुक्ताईनगरमध्ये प्रथमच जगदंबा मातेचे आगमन, भाविकांमध्ये उत्सहाचे वातावरण


मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  खामगाव शहरात सुप्रसिद्ध जगदंबा मातेचे मंदिर आहे. या मंदिराला महाराष्ट्रभरातून भाविक मोठ्या श्रद्धेने भेट देतात. या जगदंबा मातेचे दर्शन यंदा पहिल्यांदाच मुक्ताईनगरमध्ये होणार आहे. या ऐतिहासिक आणि पावन सोहळ्यामुळे शहरातील भाविकांमध्ये प्रचंड आनंदाचे व उत्सहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोजागिरी पौर्णिमेला आगमन

जगदंबा मातेचे आगमन शरद पौर्णिमा अर्थात कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी होते. दरवर्षी खामगाव येथे हा उत्सव मोठ्या दिमाखात आणि धार्मिक वातावरणांत साजरा केला जातो. हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. आता हेच दिव्य दर्शन मुक्ताईनगरमध्ये नागरिकांना आपल्या शहरात सहज उपलब्ध होणार आहे.

संताजी नगर, तेली वाडा येथे प्रथमच आगमन

मुक्ताईनगर शहरातील संताजी नगर, तेली वाडा येथे यंदा पहिल्यांदा जगदंबा मातेचे आगमन होणार आहे. यामुळे नागरिकांना प्रवास न करता, आपल्या शहरातच मातेचे दर्शन घेण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

महिला मंडळाचे आवाहन

या पावन सोहळ्याच्या आयोजनाची जबाबदारी संताजी नगर महिला मंडळाने हाती घेतली असून त्यांनी सर्व भाविकांना आवाहन केले आहे की, मोठ्या संख्येने उपस्थित राहून या धार्मिक उत्सवाचा लाभ घ्यावा.

उत्साह दुणावला

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे ज्या उत्साहाने जगदंबा उत्सव साजरा होतो, तसाच उत्साह आता मुक्ताईनगरमध्ये अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे.


Protected Content

Play sound