Home Cities जळगाव पंचायत समिती सभापती पदांच्या आरक्षणासाठी सोडत सभा 9 ऑक्टोबरला

पंचायत समिती सभापती पदांच्या आरक्षणासाठी सोडत सभा 9 ऑक्टोबरला

0
297


जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापती पदांच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळासाठी आरक्षण ठरविण्यासाठी सोडत सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा गुरुवार,9 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता, जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन, जळगाव येथे पार पडणार आहे.

ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या अधिसूचनेनुसार, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिला या प्रवर्गांसाठी सभापती पदांचे आरक्षण सोडत पद्धतीने निश्चित करण्यात येणार आहे.

प्रशासनातर्फे सर्व संबंधित अधिकारी, प्रतिनिधी आणि लाभार्थ्यांना या सभेस वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासोबतच, जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रातील इच्छुक नागरिकांनाही ही सभा प्रत्यक्ष पाहण्यासाठी उपस्थित राहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.


Protected Content

Play sound