पिंप्राळा घरकुलात ४ घरे पाडून बांधला बंगला : मनपातर्फे सिल (व्हिडीओ )

b4c9733e a408 4d26 a9c3 81bb233018f2

जळगाव, प्रतिनिधी | महापालिका मालकीच्या पिंप्राळा घरकुलात काही नागरिकांनी अनधिकृतपणे घुसकोरी केली होती. या घरकुलातील ३६ घरकुले ही पोलिसांच्या मदतीने पंचनामा करत, सिल करून ताब्यात घेण्यात आली.

महापालिकेचे पथक जेव्हा पिंप्राळा घरकुलमध्ये गेले तेव्हा तेथे ४ घरे तोडून एक आलिशान बंगला बांधलेला आढळून आला.  या बंगल्यात अंगणवाडी देखील भरली होती. बंगल्यातील महिलेने महापालिका कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. पथकाने कारवाई करत बंगल्याला अखेर सिल केले.  या ३६ पैकी ५ रहिवाश्यांनी दोन घरातील सामाईक भिंत पाडून दोन घराचे एक घर केल्याचे निदर्शनास आले. आज ८ घरांना कुलूप लावून सिल करण्यात आले. या मोहिमेत सहा. अभियंता सोनगिरे, अतिक्रमण अधीक्षक एच. एम. खान, मिळकत व्यवस्थापक राजेंद्र पाटील, लिपिक संजय पवार, राजू हंसकर, मोकदम नाना कोळी, बापू पाटील तसेच सतीश ठाकरे, हिरामण सपकाळे, शेखर ठाकूर, किशोर सोनवणे, संजय परदेसी, वाहन चालक साजिद अली, राजू वाघ व इतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन घरकुले ताब्यात घेतली.

पहा अतिक्रमणधारक महिलेचा  पथकासह  वाद 

 

Protected Content