Home Cities अमळनेर कारण नसतांना पती-पत्नीला विट व लाकडी काठीने बेदम मारहाण !

कारण नसतांना पती-पत्नीला विट व लाकडी काठीने बेदम मारहाण !

0
170

अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील दहिवद गावात दाम्पत्याला काहीही कारण नसतांना विट व लाकडी काठीने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली तसेच जीवेठार मारण्याची घटना २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता घडली आहे. याबाबत शनिवारी २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील दहिवद गावात हिराबाई प्रकाश पाटील वय ५० या महिला आपल्या पतीसह वास्तव्याला आहे. २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता त्या त्यांच्या नातेवाईकांसोबत घराच्या ओट्यावर बोलत असतांना त्यांच्या घराच्या समोर राहणारा हरीदास गुलाब पाटील, स्विटी गुलाब पाटील आणि गुलाब आत्माराम पाटील या तिघांना काहीही कारण नसतांना हिराबाई पाटील व त्यांचे पती प्रकाश पाटील यांना विट आणि लाकडी काठीने बेदम मारहाण करून दुखापत केली, तसे त्यांना जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर पिडीत महिलेने अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली, त्यानुसार मारहाण करणारे हरीदास गुलाब पाटील, स्विटी गुलाब पाटील आणि गुलाब आत्माराम पाटील तिघे राहणार दहिवद ता. अमळनेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संदेश पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound