Home प्रशासन तहसील पारोळा तालुक्यात मुसळधार पाऊस; शेतीचे मोठे नुकसान

पारोळा तालुक्यात मुसळधार पाऊस; शेतीचे मोठे नुकसान

0
262

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आज सकाळपासून पारोळा शहर आणि ग्रामीण भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे तालुक्यातील मेहू, जोगलखेडे, हनुमंतखेडे, शिरसमणी, चोरवड, मंगरूळ, वाघरा, वाघरी, कमदवाडी यांसारख्या गावांमध्ये शेत पिकांना मोठा फटका बसला आहे. नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थीक मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

या नुकसानीची दखल घेऊन, महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे सुनील देवरे यांनी प्रशासनाकडे तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी केली आहे. या प्रसंगी त्यांच्यासोबत अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते. पंचनामे करून शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी त्यांची मागणी आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर आणखी एक मोठे संकट आले आहे.

प्रशासनाने यावर गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे, जेणेकरून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान काही प्रमाणात तरी भरून काढता येईल. शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने तातडीने पाऊले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound