Home क्राईम बांधकामाचे साहित्य लांबविणाऱ्या दोन जणांना अटक !

बांधकामाचे साहित्य लांबविणाऱ्या दोन जणांना अटक !

0
123


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आदर्श नगरातील बांधकामाच्या साईटवरुन २० सेंट्रीगच्या प्लेटांसह साहित्य चोरणाऱ्या संगिताबाई प्रभाकर चौधरी, हिराबाई दिलीप चव्हाण (दोघ रा. तांबापुरा) यांच्या रामानंद नगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून चोरलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील महाबळ व आदर्श नगरात किरण जगन्नाथ पवार या ठेकेदाराच्या बांधकाम साईट सुरु आहे. या साईटवरुन १० जून व ४ जुलै रोजी बांधकामसाठी लागणारे सेंट्रींग प्लेट, लोखंडी जॅक, शिकंज्या, असा एकूण ९० हजारांचा मुद्देमाल चोरी झाला होता. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे बांधकाम साहित्य तांबापुरात राहणाऱ्या दोन महिलांनी चोरी केल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी गुन्हे शोध पथकातील उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, सुधाकर अंभोरे, जितेंद्र राजपूत, सुशिल चौधरी, जितेंद्र राठोड, विनोद सुर्यवंशी, योगेश बारी, हेमंत कळसकर, मनोज सुरवाडे, रेवानंद साळुंखे, गोविंदा पाटील, अतुल चौधरी यांचे पथक तयार केले होते.

या पथकाने तांबापुरातून संशयित संगिताबाई चौधरी व हिराबाई चव्हाण यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी बांधकाम साहित्य चोरी केल्याची कबुली दिली. तसेच चोरलेले साहित्यापैकी २० सेंट्रींग प्लेटा काढून दिल्या.


Protected Content

Play sound