Home Cities पारोळा “आले बालाजी पारोळ्याला” भक्तीगीताचे अंजली पवार यांच्याहस्ते प्रकाशन

“आले बालाजी पारोळ्याला” भक्तीगीताचे अंजली पवार यांच्याहस्ते प्रकाशन

0
250

पारोळा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्याचे आराध्य दैवत श्री बालाजी प्रभू यांच्यावरील “आले बालाजी पारोळ्याला” या नव्या भक्तीगीताचे प्रकाशन नुकतेच पारोळा येथील श्री बालाजी मंदिरात मोठ्या उत्साहात पार पडले. या भक्तीभावनेने ओतप्रोत भरलेल्या कार्यक्रमात माजी नगरसेविका सौ. अंजली पवार यांच्याहस्ते गीताचे प्रकाशन करण्यात आले.

संगीत साक्षरता बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून साकारण्यात आलेले हे भक्तीगीत स्थानिक भक्तांसाठी एक भावनिक पर्वणी ठरली. सुप्रसिद्ध गायिका वैशाली शिंदे यांनी या गीताला संगीत दिले असून त्यांच्या गोड आवाजातच हे गीत रेकॉर्ड करण्यात आले आहे. गीताचे शब्दलेखन संजय जवरास यांचे असून संगीत संयोजन विकी देशमुख यांनी केले आहे. या गीतासाठी माजी नगरसेवक नवल उर्फ भैय्या चौधरी यांनी प्रयोजन केले आहे.

प्रकाशन सोहळ्याला गायिका वैशाली शिंदे यांच्यासह बालाजी संस्थेचे ट्रस्टी भैय्या शिंपी, माजी नगरसेवक भैय्या चौधरी, दीपक अनुष्ठान, गुणवंत चौधरी, प्रा. विश्वास कोळी, अमोल भावसार, संजय जवरास, भागवत चौधरी, प्रवीण चौधरी, महेश चौधरी आणि यशस जवरास आदी मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रम धार्मिक भक्तीभावनेने भारलेला होता आणि उपस्थित नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या नव्या भक्तीगीताच्या माध्यमातून पारोळा येथील धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला नवचैतन्य लाभणार आहे. श्री बालाजी प्रभूंच्या भक्तांसाठी हे गीत एक नवे भक्तिपथाचे साधन ठरणार आहे. कार्यक्रमाच्या शेवटी गायिका वैशाली शिंदे यांनी “बालाजी सॉन्ग बाय वैशाली शिंदे” असे युट्युबवर सर्च करून गीत ऐकण्याचे आवाहन केले.


Protected Content

Play sound