Home करियर टॉवरच्या बॅटरऱ्यांची चोरी; गुन्हा दाखल

टॉवरच्या बॅटरऱ्यांची चोरी; गुन्हा दाखल

0
160

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील आदर्श नगरातील टॉवरमध्ये बसलेल्या ४५ हजार रुपये किंमतीच्या २४ बॅटरी चोरुन नेल्या. ही घटना २० ऑगस्ट रोजी तपासणीसाठी गेलेल्या सुपरवायझरच्या लक्षात आली. याप्रकरणी सोमवारी १५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील शहरातील आदर्श नगरातील रुस्तमजी शाळेजवळ टॉवर बसविण्यात आले आहे. २० ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास इंडस टॉवरचे सुपरवायझर विकास चंद्रकांर हे टॉवर व्यवस्थित काम करत नसल्याने हे पाहण्यासाठी तेथे गेले होते. यावेळी त्यांना टॉवरमध्ये बसविलेल्या २४ बॅटरी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली होती. दरम्यान, सोमवारी १५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता अमोल चरणदास शेंद्र यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन रामानंद नगर पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक हेमंत कळसकर हे करीत आहे.


Protected Content

Play sound