Home क्राईम तरूणावर धारदार शस्त्राने वार करणाऱ्या चौघांना अटक !

तरूणावर धारदार शस्त्राने वार करणाऱ्या चौघांना अटक !

0
281

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जुन्या वादातून हर्षल उर्फ बब्या कुणाल पाटील (वय १८, रा. एकनाथ नगर, रामेश्वर कॉलनी) या तरुणावर धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याची घटना रविवारी १४ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता रामेश्वर कॉलनीतील राज शाळेजवळ घडली होती. याप्रकरणी सोमवारी १५ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२.३० वाजता चार जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक करण्यात आले आहे. यामध्ये तीन जण रेकॉर्डवरील गुन्हेगार असून एकावर तर या पूर्वी ‘एमपीडीए’चीदेखील कारवाई झालेली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जुन्या वादातून टोळक्याने हर्षल पाटील या तरुणावर रविवारी १४ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला होता. या प्रकरणी जखमीचा मित्र नितीन राजेंद्र देशमुख (२१, रा. मंगलपुरी) या तरुणाने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सोहम् गोपाल ठाकरे, दिनेश भरत चौधरी, सनी उर्फ फौजी बाळकृष्ण जाधव, सागर फुलचंद जाधव उर्फ पाव (सर्व रा. रामेश्वर कॉलनी) या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चारही जणांना अटक करण्यात आले आहे. अटक केलेल्यांपैकी सोहम् ठाकरे वगळता अन्य तिघे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यातील सनी जाधव याच्यावर या पूर्वी ‘एमपीडीए’चीदेखील कारवाई झालेली आहे.


Protected Content

Play sound