Home Cities मुक्ताईनगर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची मुक्ताईनगरात रणनीती बैठक उत्साहात

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची मुक्ताईनगरात रणनीती बैठक उत्साहात


मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राची विस्तृत बैठक नुकतीच प्रदेश सरचिटणीस ॲड. रविंद्र भैय्यासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांसाठी पक्षाची दिशा, धोरणे आणि रणनीतीबाबत सखोल चर्चा करण्यात आली. कार्यकर्त्यांच्या जोमदार उपस्थितीत ही बैठक उत्साही वातावरणात संपन्न झाली.

या बैठकीच्या निमित्ताने ॲड. रविंद्र भैय्यासाहेब पाटील यांची प्रदेश सरचिटणीसपदी झालेल्या निवडीबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या नेतृत्वाचा गौरव केला. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात ॲड. पाटील यांनी प्रत्येक कार्यकर्त्याने स्वतःचा मतदान केंद्र (बूथ) अधिक सक्षम करण्यावर भर देण्याचे आवाहन केले. बूथस्तरावर मजबूत संघटन उभे राहिले तर कोणतीही निवडणूक जिंकता येते, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

या बैठकीत २ सप्टेंबर रोजी माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांचा वाढदिवस सार्वजनिक उपक्रमांनी साजरा करण्याचा निर्णयही घेण्यात आला. सामाजिक भान जपत आरोग्य तपासणी शिबिरे, स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण यांसारखे कार्यक्रम राबवण्याचे आवाहन करण्यात आले.

बैठकीस जिल्हा उपाध्यक्ष ईश्वर रहाणे, मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष यू. डी. पाटील, बोदवड तालुका अध्यक्ष प्रशांत (आबा) पाटील, रावेर तालुका अध्यक्ष किशोर पाटील, उपसभापती ज्ञानेश्वर पाटील, संचालक रामभाऊ पाटील, माजी सभापती निवृत्ती भाऊ पाटील, दशरथ कांडेलकर, विलास धायडे, राजेंद्र माळी, विकास पाटील, सरपंच डॉ. बी. सी. महाजन, वामनराव साठे, विलास भाऊ देवकर, मधुकर पाटील, पवन चौधरी, किसान महाजन, अमित खान, रविंद्र दांडगे, लक्ष्मण (बबलू) सापधरे, राजेंद्र (सोनू) पाटील, श्रीराम पाटील, बी. टी. महाजन तसेच अनेक गावांचे सरपंच, पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.


Protected Content

Play sound