Home Cities मुक्ताईनगर पुराव्यांशी छेडछाड केल्याचा रोहिणी खडसेंवर आरोप !

पुराव्यांशी छेडछाड केल्याचा रोहिणी खडसेंवर आरोप !


पुणे-वृत्तसेवा । पती प्रांजल खेवलकर यांच्या पाठोपाठ आता रोहिणी खडसे या देखील गोत्यात येण्याची शक्यता असून त्यांच्यावर पुराव्यांशी छेडछाड करण्याचा आरोप करण्यात येत आहे.

प्रांजल खेवलकर यांना कथित रेव्ह पार्टीच्या आरोपावरून अटक करण्यात आली असून ते सध्या कारागृहात आहेत. या प्रकरणानंतर त्यांच्यावर नवनवीन आरोप होत आहेत. तर काही दिवसांपूर्वी नवा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. आता खेवलकर यांच्या पाठोपाठ त्यांच्या पत्नी तथा राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे या देखील अडचणीत सापडल्या आहेत.

प्रांजल खेवलकर यांनी जळगाव येथील सोनार आडनावाच्या व्यक्तीच्या नावावर सीमकार्ड घेऊन तेच ते वापरत होते. त्यांच्या व्हाटसअप चॅटमध्ये आधीच आक्षेपार्ह बाबी आढळून आल्या आहेत. या सर्व गदारोळात सोनार यांनी सीमकार्ड हरवल्याची तक्रार करून त्याच क्रमांकाचे नवीन सीमकार्ड बनवून घेतले. त्यांनी या सीमकार्डवर व्हाटसअप अॅक्टीव्हेट करून यातील डाटा डिलीट करून टाकला. या प्रकरणी रोहिणी खडसे यांच्यावर आरोप करण्यात येत आहेत. त्यांनीच व्हाटसअपचा डाटा डिलीट करण्यास सांगितल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. यामुळे या प्रकरणात आता रोहिणी खडसे या देखील गोत्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.


Protected Content

Play sound