Home Uncategorized कारण नसतांना तरूणाला दारूच्या नशेत मारहाण !

कारण नसतांना तरूणाला दारूच्या नशेत मारहाण !

0
207


धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । काहीही कारण नसतांना एका तरूणाला दारूच्या नशेत येवून शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना धरणगाव तालुक्यातील पाळधी गावात सोमवारी १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता घडली आहे. याबाबत बुधवारी २० ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शिवाजी शंकर शिंदे वय २८ रा. शनीनगर, पाळधी ता. धरणगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सेामवारी १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता शिवाजी शिंदे हा तरूण गावातील पानटपरीजवळ उभा असतांना संशयित आरोपी सुलतान शेख रा. पाळधी ता. धरणगाव हा दारूच्या नशेत येवून शिवाजी शिंदे याला शिवीगाळ करू लागला त्यानंतर चापटाबुक्क्यांनी मारहाण करून दुखापत केली. हा प्रकार घडल्यानंतर शिवाजी शिंदे याने धरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात संशयित आरोपी सुलतान शेख याच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ संदीप खंडारे हे करीत आहे.


Protected Content

Play sound