Home राजकीय महाराष्ट्राचे राज्यपाल राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार

महाराष्ट्राचे राज्यपाल राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार


मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रीय लोकशाही आघाडीने महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी जाहीर केली आहे.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपला पदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदाची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यात भाजपच्या वतीने कुणाला उमेदवारी मिळणार ? याबाबत मोठी उत्सुकता लागली होती. याबाबत अनेक नावांची चर्चा सुरू करण्यात आली होती. आज अखेर याबाबतचा सस्पेन्स दुर झाला आहे. भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डांकडून उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

आज भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ते एनडीए म्हणजेच राष्ट्रीय लोकशाही उमेदवारीचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यांची लढत आता कुणाशी होणार ? याची उत्सुकता लागली आहे.


Protected Content

Play sound