जळगाव प्रतिनिधी । शहरातील बजरंग बोगद्याजवळ असलेल्या गौरी अव्हेन्यू अपार्टमेंटमध्ये भर दिवसा दोन फ्लॅटमध्ये घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना आज दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार प्रेमचंद जमतदास ललवानी (वय ६०, रा. गौरी अव्हेन्यू श्रीकृष्ण नगर जिल्हा परिषद कॉलनी ) यांचे प्लॅट ६ मध्ये राहतात. आज दुपारी त्यांची पत्नी नीता ललवाणी सोबत रिंग रोड येथील ओजस आयुर्वेद दवाखान्यात तपासण्यासाठी केले होते. तर त्यांची मुलगी प्रियंका ललवाणी या कामाला गेल्या होत्या. दुपारी ४ वाजेच्या सुमारास अज्ञात ३ चोरट्यांनी घरात शिरून घरातील एक लाख रुपये रोख, आठ तोळे सोने चांदीचे शिक्के मूर्ती असा लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला. त्याचबरोबर त्यांच्या घरासमोर राहत असलेले अॅडव्होकेट ललित सुभाष पाटील हे जिल्हा न्यायालयात वकील म्हणून काम करतात. त्यांच्या नातेवाईकांची वर्षी असल्याने ते गावाला गेले होते यावेळी चोरट्यांनी देखील या ठिकाणी घरफोडी करत हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला
गीता ललवाणी यांनी केली आरडाओरड
दरम्यान, अज्ञात चोरटे घरात चोरी करत असताना थोड्यावेळाने गीता ललवाणी आपल्या पतीसह घरी आल्या लिफ्टनेवर आल्यानंतर तिसर्या मजल्यावर लिफ्ट बाहेर निघत असताना तीन पैकी एक चोरटा बाहेर बॅग धरून उभा होता. त्याच वेळी त्या चोरट्याने चलो चलो असे सांगत घरातून पसार झाले. त्यानंतर गीता ललवानी यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. यात चोरट्यांनी पांढरी कार क्रमांक एमएच १९- ७९६८ कारमध्ये एक चोरटा गाडी सुरू ठेवून बसलेला होता. यामुळे चोरटे धावून खाली उतरताच त्यांनी कारमध्ये बसून फरार झाले गीता ललवाणी यांनी आरडाओरड केल्यानंतर वॉचमनने कारवर दगडफेक केली. टनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली तसेच स्वान आणि ठसे तज्ञ पथक देखील थोड्यावेळाने दाखल झाले होते सोबत विभागीय पोलीस अधिकारी नीलाभ रोहन यांनी घटनास्थळी पाहणी करून चौकशी सुरू आहे.