Home Uncategorized वरणगावात ‘हर घर तिरंगा’ आणि ‘आंतरराष्ट्रीय युवा दिन’ रॅलीचा जल्लोष!

वरणगावात ‘हर घर तिरंगा’ आणि ‘आंतरराष्ट्रीय युवा दिन’ रॅलीचा जल्लोष!


वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वरणगाव येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आणि दिशा केंद्र ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हर घर तिरंगा’ मिशन आणि आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीने संपूर्ण वरणगावात उत्साहाचे वातावरण निर्माण केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य विजय पवार यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून संबोधित केले. त्यांनी ‘हर घर तिरंगा’ अभियानाचे महत्त्व आणि युवा दिनाचे औचित्य साधून युवकांच्या राष्ट्रनिर्माणातील भूमिकेवर प्रकाश टाकला. ‘हर घर तिरंगा, घर घर तिरंगा’ आणि ‘युवा दिनाचा विजय असो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता, ज्यामुळे देशभक्ती आणि युवाशक्तीचा संगम दिसून आला.

या रॅलीच्या यशस्वी नियोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. नितीन इंगळे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. राहुल जोहरे, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. रजनी इंगळे, समुपदेशिका श्रीमती ज्योती गुरव आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले. महाविद्यालयातून सुरू झालेली ही रॅली मुख्य तिरंगा चौकातून फिरून पुन्हा महाविद्यालयात समारोप करण्यात आली.

यावेळी डॉ. बी. जी. देशमुख, डॉ. अनिल हरी शिंदे, डॉ. अशोक चित्ते, प्रा. ए. एम. कलवले, प्रा. मनिषा इंगळे, प्रा. रुपाली पाटील, प्रा. हेमराज मेतकर, प्रा. योगेश्वर पाटील, प्रा. चेतन पाटील, डॉ. अनिल पाटील, प्रा. विजय पाटील, प्रा. उंबरकर, संध्या निकम मॅडम, श्रीमती भावना प्रजापति, रविभाऊ पाटील यांच्यासह अनेक प्राध्यापक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती आणि सामाजिक जबाबदारीची भावना रुजवण्यासाठी महत्त्वाचा ठरला.


Protected Content

Play sound