Home राजकीय प्रांजल खेवलकर यांचे ‘सेक्स रॅकेट’ : रूपाली चाकणकरांचा सनसनाटी आरोप !

प्रांजल खेवलकर यांचे ‘सेक्स रॅकेट’ : रूपाली चाकणकरांचा सनसनाटी आरोप !


पुणेलाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी।– एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्याकडून आक्षेपार्ह व्हिडीओ आढळले असून यात तरूणींचे लैंगीक शोषण करण्यात आले असून हे एक मोठे रॅकेटच असावे ! असा सनसनाटी आरोप राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.

रूपाली चाकणकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मोठा गौप्यस्फोट केला. त्या म्हणाल्या की, प्रांजल खेवलकर यांचा मोबाईल व लॅपटॉपमधून अनेक आक्षेपार्ह व्हिडीओच आढळले आहेत. यात काही तरूणींना ब्लॅकमेल करून त्यांचे शोषण करण्यात आल्याची शक्यता आहे. हे एक मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. या प्रकरणी तरूणींनी समोर येऊन तक्रारी द्याव्यात असे आवाहन त्यांनी केले.

या माध्यमातून गरजू आणि गरीब मुलींचे शोषण करण्यात आल्याची शक्यता असल्याचे रूपाली चाकणकर म्हणाल्या. तर आपल्याला रोहिणी खडसे यांची किव वाटते, आता त्या पतीचे कसे समर्थन करणार ? असे खोचक वक्तव्य देखील रूपाली चाकणकर यांनी केले. तर, या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी या पत्रकार परिषदेत केली.

दरम्यान, पत्रकार परिषद संपल्यानंतर टिव्ही नाईन या वाहिनीशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून आ. एकनाथ खडसे यांनी हा बदनामीचा डाव असल्याचे प्रतिपादन केले. ते म्हणाले की, हे सर्व प्रकरण अंमली पदार्थाचे असून खेवलकर यांनी याचे सेवन केल्याचे कोणतेही पुरावे नाहीत. तर आता मुद्दाम आम्हाला बदनाम करण्याचे हे षडयंत्र असून याला आम्ही घाबरणार नसल्याचे आमदार एकनाथ खडसे यांनी याप्रसंगी नमूद केले.


Protected Content

Play sound