
पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा शहरातील मोठ्या राम मंदिरात दर मंगळवारी सायंकाळी ७ वाजता विशेष आरतीचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. श्रीराम मंदिर संस्थानच्या विश्वस्तांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. या उपक्रमांतर्गत, प्रत्येक मंगळवारी विविध मान्यवरांना आरतीचा मान दिला जात आहे.

या उपक्रमाच्या पहिल्या मंगळवारी श्री गुरु हरिहरानंद स्वामीजी, भोले बाबा जून पाणी आश्रम, शिरसमनी (ता. पारोळा) हे आरतीचे मानकरी होते आणि त्यांच्या हस्ते आरती संपन्न झाली. आता दुसऱ्या मंगळवारी, म्हणजेच आज सायंकाळी, तरवाडे (ता. पारोळा) येथील समर्पण गोशाळेचे संचालक ह.भ.प. रविदासजी महाराज हे आरतीचे मानकरी होते. त्यांच्या हस्ते विधिवत आरती करण्यात आली.
यावेळी रविदासजी महाराजांनी पारोळा शहर आणि तालुक्यातील तरुण मित्रमंडळींना एक विशेष संदेश दिला. त्यांनी आवाहन केले की, सर्वांनी दर मंगळवारी होणाऱ्या या आरतीला उपस्थित राहावे आणि या धार्मिक उपक्रमात सहभागी व्हावे. आरती संपन्न झाल्यानंतर, मोठ्या राम मंदिराच्या विश्वस्तांच्या वतीने ह.भ.प. रविदासजी महाराजांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी शहरातील अनेक नागरिक, मंदिराचे विश्वस्त आणि अन्य भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा उपक्रम शहरात धार्मिक वातावरण निर्मितीस मदत करत



