Home आरोग्य धरणगाव येथे नेत्र तपासणी शिबिराचे रेकॉर्ड ब्रेक; पालकमंत्र्यांकडून मोफत सेवा

धरणगाव येथे नेत्र तपासणी शिबिराचे रेकॉर्ड ब्रेक; पालकमंत्र्यांकडून मोफत सेवा


धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रेरणेतून आणि जि.प.सदस्य प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांच्या विशेष प्रयत्नांतून जीपीएस मित्र परिवारातर्फे भव्य नेत्र तपासणी व मोफत मोतिबिंदू ऑपरेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला प्रचंड आणि अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून, मागील सर्व शिबिरांचे रेकॉर्ड मोडले गेले आहेत.

आज सकाळी ७ वाजल्यापासूनच गावागावातून अबालवृद्ध नागरिकांनी नेत्र तपासणीसाठी मोठी गर्दी केली होती. आलेल्या सर्व रुग्णांची आधी नोंदणी करून त्यांची तपासणी करण्यात आली. या शिबिरामध्ये एकूण १५१० रुग्णांची नोंदणी करण्यात आली, त्यापैकी २१० रुग्णांना पनवेल येथील सुप्रसिद्ध शंकरा नेत्र रुग्णालयात मोतिबिंदू ऑपरेशनसाठी पाठविण्यात आले आहे. उर्वरित २४० रुग्ण सोमवार, ११ ऑगस्ट रोजी पाठवले जाणार आहेत.

या शिबिरात रुग्णांसाठी नाश्ता आणि जेवणाचीही सोय करण्यात आली होती. रुग्णांकडून कोणताही मोबदला न घेता सर्व सेवा मोफत देण्याचे नियोजन करण्यात आले होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील, प्रतापराव पाटील आणि विक्रम पाटील हे या दृष्टीदान संकल्पनेसाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून, प्रत्येक रुग्ण त्यांना धन्यवाद देत आभार मानत आहे.

या शिबिरासाठी शंकरा हॉस्पिटलची पूर्ण टीम, तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी संजय चव्हाण, डॉ. चंदन चौधरी, डॉ. प्रशांत कोळी, डॉ. भूपेंद्र वाघ, डॉ. संदीप पाटील, डॉ. प्रीती पाटील, डॉ. सायमा खान, डॉ. निळोफर शेख, अतुल नानवरे, मेश्राम मॅडम आणि डॉ. राहुल चौधरी यांच्यासह पाळधी आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी, जीपीएस मित्र परिवार, शिवसेना आणि युवासेना यांनी अपार मेहनत घेऊन हे शिबीर यशस्वी केले. जसे गुलाबराव पाटील यांना महाराष्ट्रात ‘पाणीवाला बाबा’ म्हणून ओळखले जाते, तसेच आता ‘दृष्टी देणारा बाबा’ अशी त्यांची नवीन ओळख निर्माण होत आहे, असे बोलले जात आहे.


Protected Content

Play sound