Home Cities जळगाव जिल्हास्तरीय लोकशाही दिनात ७५ अर्ज दाखल !

जिल्हास्तरीय लोकशाही दिनात ७५ अर्ज दाखल !


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी: जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचा कार्यक्रम आज, ४ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता अल्पबचत भवन, जळगाव येथे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात नागरिकांनी विविध समस्या आणि प्रश्नांसंदर्भात एकूण ७५ अर्ज सादर केले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री माळी, तसेच संबंधित विभागांचे अधिकारी, तहसीलदार (संजय गांधी योजनांतर्गत) डॉ. उमा ढेकळे, नायब तहसीलदार राहुल सोनवणे (करमणूक शाखा), आणि इतर शाखांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकशाही दिनात प्राप्त झालेल्या अर्जांचे तात्काळ निराकरण करण्यासाठी उपस्थित अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी निर्देश दिले. तसेच, प्राप्त अर्जांचा विभागवार आढावा घेऊन त्यावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. या उपक्रमामुळे नागरिकांना आपल्या समस्या थेट प्रशासनासमोर मांडण्याची संधी मिळाली, ज्यामुळे त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक जलदगतीने होण्यास मदत होईल.


Protected Content

Play sound