Home Cities अमळनेर चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील एका गावातून एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी, २८ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता ही घटना घडली असून, या प्रकरणी मंगळवारी, २९ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील एका गावातील संबंधित अल्पवयीन मुलगी सोमवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास खेळण्यासाठी घराबाहेर पडली होती. त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले. मुलगी बराच वेळ घरी न परतल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिची शोधाशोध सुरू केली. नातेवाईकांनी सर्व संभाव्य ठिकाणी चौकशी केली, परंतु मुलीबद्दल कोणतीही माहिती मिळू शकली नाही. अखेर, मुलीच्या पालकांनी हताश होऊन मंगळवारी सायंकाळी ६ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार नोंदवली.

पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार गणेश पाटील करत आहेत.


Protected Content

Play sound