Home Cities जळगाव तेली समाजाची बैठक : परिवर्तन व एकजुटीवर चर्चा !

तेली समाजाची बैठक : परिवर्तन व एकजुटीवर चर्चा !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र प्रदेश तेली महासंघाच्या वतीने रविवारी जळगाव शहरातील हॉटेल स्टार पॅलेस येथे एका महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत समाजाच्या भविष्यातील वाटचालीवर आणि एकजुटीवर चर्चा करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात संत जगनाडे महाराज यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून करण्यात आली. यावेळी प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांनी उपस्थित समाजबांधवांशी संवाद साधत, समाजाच्या विकासासाठी आणि परिवर्तनासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. या बैठकीला जळगाव जिल्ह्यातील समाजबांधव उपस्थित होते.

भविष्यात राज्य परिषदेचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. ही राज्य परिषद समाजाच्या परिवर्तनासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी व्यासपीठ ठरेल, असे हाराष्ट्र प्रदेश तेली महासंघाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांनी सांगितले. जुन्या रूढी आणि परंपरांकडे लक्ष देऊन त्यात काळानुरूप बदल घडवण्यावर भर दिला जाईल. आगामी राज्य परिषदेमध्ये विविध भागांतील १ लाखाहून अधिक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.

यावेळी समाजाच्या वतीने मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला जळगाव जिल्हाध्यक्ष दत्तात्रय चौधरी, उपाध्यक्ष विनोद चौधरी, ॲड. वसंत भोलाणे, सेवा आघाडी प्रदेश तेली महासंघाचे प्रदेशाध्यक्ष बी.एम. चौधरी, नंदू चौधरी, सिताराम देवरे, अनिल चौधरी, अशोक चौधरी, प्रशांत शिंदे, प्रशांत सुरळकर, शामकांत चौधरी आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound