Home क्राईम एसटी वर्कशॉपमागे प्रौढ मृतावस्थेत आढळल्याने खळबळ !

एसटी वर्कशॉपमागे प्रौढ मृतावस्थेत आढळल्याने खळबळ !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एसटी वर्कशॉपच्या मागील भागात एक ४५ वर्षीय प्रौढ व्यक्ती मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवारी २१ जुलै रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत व्यक्तीचे नाव जयेश वसंत काळे (वय ४५, रा. पिंप्राळा हुडको, जळगाव) असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जयेश काळे हे आपल्या कुटुंबीयांसह पिंप्राळा परिसरात वास्तव्याला होते. सोमवारी २१ जुलै रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्यांचा मृतदेह जळगाव शहरातील एसटी वर्कशॉपच्या मागील भागात आढळून आला. त्यांच्या पत्नी छाया काळे यांनी त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती जयेश काळे यांना मृत घोषित केले.

जयेश काळे यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या घटनेसंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संजीव मोरे हे करत आहेत.


Protected Content

Play sound