Home Cities यावल यावलमध्ये रक्तदान शिबिरात १२८ युवकांनी दिले रक्तदान

यावलमध्ये रक्तदान शिबिरात १२८ युवकांनी दिले रक्तदान


यावल–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला युवकांचा मोठा प्रतिसाद लाभला. रावेरचे आमदार अमोल जावळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण साकारले गेले.

यावल तालुका भाजप मंडळाच्या माध्यमातून आयोजित हे शिबीर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात संपन्न झाले. संजीवनी ब्लड बँक फैजपूर यांच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या या शिबिरात एकूण १२८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. युवकांपासून तर वयोवृद्ध कार्यकर्त्यांपर्यंत सर्व स्तरांतील लोकांनी या उपक्रमात सहभागी होऊन समाजासाठी योगदान दिले.

या शिबिरात कृषिउत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व संचालक नारायण चौधरी, भाजप तालुका अध्यक्ष सागर कोळी, खरेदी विक्री संघाचे संचालक उमेश फेगडे, कृउबा संचालक उज्जैनसिंग राजपूत, माजी जिल्हा परिषद सदस्या सविता भालेराव, जेष्ठ पदाधिकारी हिरालाल चौधरी, पदाधिकारी विलास चौधरी, हेमराज उर्फ बाळू फेगडे, व्यंकटेश बारी, भुषण फेगडे, लहू पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. रक्तदान हा सर्वोत्तम मानवसेवेचा मार्ग आहे, याची जाणीव या उपक्रमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. फडणवीस यांचा वाढदिवस अशा समाजोपयोगी उपक्रमाने साजरा केल्याने कार्यकर्त्यांत विशेष उत्साह दिसून आला.


Protected Content

Play sound