
मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । १९८० आणि ९० च्या दशकात अंडरवर्ल्डचे बॉलीवूडशी असलेले संबंध हे कोणालाही थरकाप उडवणारे होते. त्याकाळी दाऊद इब्राहिम हा फक्त गुन्हेगारी जगतातच नाही, तर बॉलीवूडमध्येही आपले वर्चस्व गाजवत होता. कोणीही हिरोईन त्याला आवडली, की ती त्याच्या नजरेत आली नाही अशी गोष्टच नव्हती. फक्त मंदाकिनीच नव्हे, तर आणखीही काही अभिनेत्री दाऊदच्या प्रेमात गुंतल्या होत्या, किंवा दाऊद त्यांच्या प्रेमात.

८० च्या दशकात ‘राम तेरी गंगा मैली’ चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री मंदाकिनी ही दाऊदच्या प्रेमात असल्याचे बरेचदा बोलले गेले. १९९४ मध्ये तिचा दाऊदसोबतचा एक फोटो व्हायरल झाला होता, ज्यात ती शारजाहमध्ये क्रिकेट मॅच दरम्यान त्याच्या बाजूला बसलेली दिसली. या घटनेने मोठा वाद निर्माण केला होता. मंदाकिनीने मात्र या सर्व गोष्टी अफवा असल्याचे सांगून नाकारले. अनेक वर्षे गायब झाल्यानंतर तिने भारतात परत येऊन एका डॉक्टरशी विवाह केला आणि सध्या सोशल मीडियावर सक्रिय आहे.
दुसरी अभिनेत्री जॅस्मीन धुन्ना, जी ‘वीराना’ या हिट भयपटात झळकली होती, ती तिच्या सौंदर्यामुळे प्रचंड लोकप्रिय झाली होती. मात्र हिची लोकप्रियता वाढत असतानाच ती अचानक गायब झाली. अनेक माध्यमांनुसार दाऊद तिच्यावर मोहित झाला होता आणि तिला धमक्या देत होता. यानंतर जॅस्मीन कुठे गायब झाली हे आजतागायत कोणालाही समजलेले नाही.
पाकिस्तानी अभिनेत्री अनीता अयूब हिनेही हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले होते. ती जेव्हा स्ट्रगल करत होती, तेव्हा दाऊदने तिला आधार दिला आणि त्यांच्यात जवळीक वाढली. नंतर अचानकच ती चित्रपटसृष्टीतून नाहीशी झाली. तिच्याबाबत अनेक अफवा पसरल्या. काही बातम्यांनुसार ती आता न्यूयॉर्कमध्ये तिच्या मुलासोबत राहत आहे.
दाऊदसोबत नाव जोडले गेलेल्या आणखी एका अभिनेत्रीचे नाव म्हणजे महविश हयात. पाकिस्तानातील ही आयटम गर्ल एका गाण्यात झळकल्यानंतर दाऊदच्या नजरेत आली. त्यावेळच्या माध्यमांनुसार दाऊद तिच्यावर फारच मोहित झाला होता. ३७ वर्षांची महविश अजूनही अविवाहित आहे. एका मुलाखतीत तिने लवकरच लग्नाच्या बातम्या देण्याचे संकेत दिले होते, परंतु अद्याप तिने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.



