Home क्राईम महाबळ परिसरातून तरुण झाला बेपत्ता

महाबळ परिसरातून तरुण झाला बेपत्ता

0
206


जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील महाबळ परिसरात राहणारा एक अठरा वर्षीय तरुण हा घरात काही न सांगता घरातून कुठेतरी निघून गेला. या संदर्भात रामानंदनगर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यश विष्णुकांत तापडिया (वय 18 रा. महाबळ) असे बेपत्ता झालेल्या करुणाचे नाव आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील महाबळ परिसरात यश तापडिया हा तरुण आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. दरम्यान शुक्रवारी 11 जुलै रोजी पहाटे 5 वाजता त्याने घरात काहीही न सांगता घरातून कुठेतरी निघून गेला. त्यानंतर तो घरी परतला नाही. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला. परंतु त्याच्या संदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही अखेर त्याच्या पालकांनी दुपारी 12 वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यातुन खबर दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ अजित पाटील करत आहे.


Protected Content

Play sound