Home Cities जळगाव सिंधी समाजातील विवाहयोग्य मुलींच्या परिचय पुस्तिकेचे प्रकाशन!

सिंधी समाजातील विवाहयोग्य मुलींच्या परिचय पुस्तिकेचे प्रकाशन!


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सिंधी समाजात विवाह जुळवण्याच्या उद्देशाने ‘बाबा हरदासराम सिंधी मॅट्रिमोनी’ तर्फे एक अभिनव उपक्रम राबवण्यात आला आहे. गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर आज मान्यवरांच्या हस्ते सिंधी समाजातील विवाहयोग्य उपवर मुलींच्या परिचय पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

या परिचय पुस्तिकेत ३०० हून अधिक सिंधी समाजातील मुलींची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या उपक्रमामुळे सिंधी समाजातील मुला-मुलींना योग्य जीवनसाथी शोधणे अधिक सोपे होणार आहे. पारंपरिक पद्धतींसोबतच आधुनिक माध्यमांचा वापर करून समाजाला एकत्र आणण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे.

‘बाबा हरदासराम सिंधी मॅट्रिमोनी’ने या उपक्रमाद्वारे समाजातील एक महत्त्वाची गरज पूर्ण केली आहे. उपवर मुलांनी या पुस्तिकेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. या पुस्तिकेमुळे विवाह जुळवण्याच्या प्रक्रियेला गती मिळेल आणि समाजातील एकोपा वाढण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.

याप्रसंगी अशोक रमानी, रमेश कटारिया, रमेशलाल कटारिया, वासुदेव कुकरेजा, गुरुमुगदास चलरेजा, शितलदास जवाहरानी आदी प्रमुख समाजबांधव उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने या उपक्रमाला अधिक बळ मिळाले.


Protected Content

Play sound