Home क्राईम तरुणावर धारदार शस्त्राने वार; दोघांविरोधात गुन्हा दाखल !

तरुणावर धारदार शस्त्राने वार; दोघांविरोधात गुन्हा दाखल !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील व्यंकटेश नगर येथे उद्देश मंगेश पाटील (वय २५) या तरुणाला कोणतेही कारण नसताना दोन जणांनी शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच, धारदार शस्त्राने वार करून त्याला कानावर व हातावर गंभीर दुखापत केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी ८ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता घडली आहे. या हल्लेखोरांनी उद्देश पाटीलला जीवे ठार मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणी सायंकाळी पाच वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात दोन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, उद्देश मंगेश पाटील हा व्यंकटेश नगरात राहणारा असून, तो सीसीटीव्ही टेक्निशियन म्हणून काम करून आपला उदरनिर्वाह करतो. मंगळवारी ८ जुलै रोजी साडेअकरा वाजता ही घटना घडली. विजय कोळी आणि श्याम कोळी (पूर्ण नाव माहित नाही, दोघे रा. हरी विठ्ठल नगर) या दोघांनी काहीही कारण नसताना उद्देश पाटील याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी त्याला बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर त्यांनी धारदार हत्याराने डाव्या कानावर आणि हातावर वार करून त्याला जखमी केले. हल्ल्याच्या वेळी त्याला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली.

या घटनेनंतर उद्देश पाटील याने तातडीने रामानंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्याच्या फिर्यादीनुसार, मारहाण करणारे विजय कोळी आणि श्याम कोळी या दोघांवर संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल शरद वंजारी करत आहेत.


Protected Content

Play sound