Home क्राईम बस चालकाच्या हलगर्जीपणामुळे प्रवासी गंभीर जखमी !

बस चालकाच्या हलगर्जीपणामुळे प्रवासी गंभीर जखमी !

0
159


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नेरी नाका लक्झरी स्थानकाजवळ कल्याण जाण्यासाठी लक्झरी बसमध्ये चढत असतांना चालकाच्या हलगर्जीपणामुळे झालेल्या अपघातात एक प्रवाशी गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी २८ जून रोजी सकाळी ८ वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री ११ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात लक्झरी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, शिवाजी कडू सोळंके वय ३८ रा. कोळन्हावी ता.यावल ह.मु. कुळूज जि. पालघर हे कल्याण जाण्यासाठी शनिवारी २८ जून रोजी सकाळी ८ वाजता नेरी नाका येथील लक्झरी बसस्थानकावर उभे होते. त्यावेळी लक्झरी बस क्रमांक (एमएच १९ सीवाय ९४९९) वरील चालकाला कल्याण जाण्यासाठी विचारले. त्यावेळी चालकाने होकार दिली. त्यानंतर शिवाजी सोळंके हे बसमध्ये चढत असतांना चालकाच्या हलगर्जीपणामुळे अपघात झाला. या अपघातात शिवाजी सोळंखे हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यानंतर रात्री ११ वाजता त्यांनी शनीपेठ पोलीसात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून लक्झरी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ योगेश जाधव हे करीत आहे.


Protected Content

Play sound