Home क्राईम दारू न दिल्याच्या रागातून हॉटेल मॅनेजरला मारहाण, तोडफोड आणि रोकड लंपास !

दारू न दिल्याच्या रागातून हॉटेल मॅनेजरला मारहाण, तोडफोड आणि रोकड लंपास !


भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील वरूण हॉटेल येथे दारूची बाटली दिली नाही, या रागातून हॉटेलच्या मॅनेजरला शिवीगाळ करत हॉटेलमधील सामानांची तोडफोड करून गल्ल्यातील रोकड घेऊन गेल्याची धक्कादायक घटना सोमवारी २३ जून रोजी रात्री ९ वाजता घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी २४ जून रोजी मध्यरात्री १ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील वरण हॉटेल येथे सुमित सुभाष इंगळे वय-३३, रा.भुसावळ हा तरुण मॅनेजर म्हणून नोकरीला आहे. २२ जून रोजी कुणाल अहिरे याला दारूची बाटली दिली नव्हती. या रागातून दुसऱ्या दिवशी सोमवारी २३ जून रोजी रात्री ९ वाजता सुमित इंगळे हा तर दुकानावर असताना हॉटेलवर असताना त्या ठिकाणी कुणाल अहिरे, सोनू मस्के, नवीन लोखंडे, अमोल भुसारे आणि त्यांच्यासोबत इतर आठ ते दहा अनोळखी व्यक्ती या सर्वांनी हॉटेलवर येऊन मॅनेजर सुमित इंगळे याला शिवीगाळ करून हॉटेलमधील सामानांचे नुकसान केले. तसेच गल्ल्यातील वीस ते पंचवीस हजार रुपयांची रोकड जबरी काढून घेतले आणि हॉटेलमध्ये लावण्यात आलेले सीसीटीव्हीचे फुटेज आणि डीव्हीआर मशीन सोबत घेऊन गेल्याची घटना घडली आहे. या संदर्भात हॉटेल मॅनेजर सुमित इंगळे यांनी भुसावळ तालुका पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार कुणाल अहिरे, सोनू मस्के, नवीन लोखंडे, अमोल भुसारी यांच्यासह अनोळखी आठ ते दहा जण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर काळे करीत आहे.


Protected Content

Play sound