Home क्राईम भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी !

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रामानंद नगर येथील चर्च समोर अज्ञात कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील प्रौढ व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी २५ मे रोजी दुपारी ४ वाजता घडली आहे. याप्रकरणी सोमवारी २६ मे रोजी दुपारी ३ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, राजपूत कॉलनीत राहणारे दिवानसिंग पाटील हे रविवारी २५ मे रोजी दुपारी ४ वाजता रामानंद नगर येथील चर्च परिसरात दुचाकी क्रमांक (एमएच १९ इएर्फ १५७३) ने जात असतांना मागून येणारी कार क्रमांक (एमएच १९, ९०७९) ने जोरदार धडक दिली. या धडकेत दिवानसिंह हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी त्यांचा मुलगा चेतन राजपूत याने रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात अज्ञात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ शरद वंजारी हे करीत आहे.


Protected Content

Play sound