Home धर्म-समाज पाचोरा येथे नवे मीटरव्दारे ग्राहकांची फसवणूक

पाचोरा येथे नवे मीटरव्दारे ग्राहकांची फसवणूक

0
27
nave mitar
nave mitar

nave mitar

पाचोरा प्रतिनिधी । येथे नवीन विद्युत मीटर बसवून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्यामुळे ते तात्काळ काढून जूने मीटर बसविण्यात यावे. असे न झाल्यास शिवसेना व युवासेनातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ग्राहकांची कोणती तक्रार नसतांना नवीन मीटर बसविण्यात येत असून ते काढून जुने मीटर बसविण्यात यावे. तसेच शिवसेना युवासेनेतर्फे नागरिकांना नविन मीटर बसवण्यास विद्युत विभागाचे कोणतेही कर्मचारी आल्यास नविन मीटर बसवू देऊ नये असे आवाहन यावेळी करण्यात आले. सध्या लावलेले विद्युत मीटर हे वापरत नसतांना देखील पूर्वीपेक्षा दुप्पट-तिप्पटने युनिट फिरत आहे. नव्याने बसविले मीटर तात्काळ काढून घेवून जुने मिटर बसवुन मिळावेत, तसेच प्रती युनीटचा जो दर देण्यास ग्राहक तयार आहे. परंतू इतर कोणताही दर वीजचे अव्वाचे सव्वा बिल लावण्यात आलेले असून ते रद्द करावे. हे सर्व कार्यवाही 25 जुलै २०१९ पावेतो करावी अन्यथा शिवसेना व युवासेना पाचोरा तर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी युवासेना जिल्हा समन्वयक पप्पू राजपूत, शिवसेना शहरप्रमुख किशोर बारावकर, तालुकाप्रमुख सौरभ चेडे, युवासेना शहरप्रमुख संदीपराजे पाटील, अनिकेत सुर्यवंशी, जावेद शेख, प्रविण वाघ, वैभव राजपूत, उमेश पेंढारकर, आण्णा चौधरी, नितीन पाटील, तुषार जगताप, प्रदीप पाटील, विद्यार्थी सेनेचे जय बारावकर आदी उपस्थितीत होते.


Protected Content

Play sound