Home क्राईम जळगावातून अल्पवयीन मुलीचे अपहरण !

जळगावातून अल्पवयीन मुलीचे अपहरण !

0
183

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची घटना गुरूवारी ८ मे रोजी सकाळी ११ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी शनिवारी १० मे रोजी दुपारी ३ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गुरूवारी ८ मे रोजी सकाळी ११ वाजता पिडीत मुलगी ही घरी असतांना तिला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले आहे. ही घटना नातेवाईकांच्‍या लक्षात आल्यानंतर त्यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर तिच्या पालकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound