Home Cities जळगाव उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा होणार गौरव !

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा होणार गौरव !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केंद्र सरकारच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील १३० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव सोहळा उद्या, गुरुवार, दि. ८ मे रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. दिशा समितीच्या अध्यक्षा आणि केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते हा गौरव सोहळा होणार आहे.

या कार्यक्रमात रेल्वे सेवा, विमान सेवा, राष्ट्रीय महामार्ग, सिंचन प्रकल्प, बँकिंग, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, राष्ट्रीय आरोग्य अभियान, सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजना, लाईव्हस्टॉक मिशन, जलजीवन मिशन, अमृत भारत आणि अमृत स्टेशन योजना, ई-बस सेवा, आदिवासी ग्रामविकास योजना यांसारख्या केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या योजनांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सुमारे १३० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

या गौरव समारंभाला जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी तसेच जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यात केंद्र सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील विकासप्रक्रियेला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound