Home क्राईम मॉर्निंग वॉक करणाऱ्या दोन महिलांच्या सोनसाखळ्या चोरी; चोरटे सीसीटीव्हीत कैद!

मॉर्निंग वॉक करणाऱ्या दोन महिलांच्या सोनसाखळ्या चोरी; चोरटे सीसीटीव्हीत कैद!

0
155


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात मॉर्निंग वॉक करणाऱ्या दोन महिलांना एकाच दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी लक्ष्य करत त्यांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून नेल्या. ही घटना १ मे रोजी सकाळी घडली असून, दोन्ही घटनांमधील चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

पहिली घटना प्रेमनगर परिसरात घडली. पूजा मनोज चांडक (वय ४२, रा. प्रेमनगर) या त्यांच्या परिसरातील एका मंदिराजवळ सकाळी फिरत असताना मागून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील १३ ग्रॅम वजनाची सोनपोत हिसका मारून तो दुचाकीवर बसलेल्या आपल्या साथीदारासह पसार झाला. या घटनेनंतर काही वेळातच दुसरी घटना फॉरेस्ट कॉलनीजवळ घडली. संगीता राजेश कऱ्हे (वय ५२, रा. बहिणाबाई बगीचाजवळ) या मॉर्निंग वॉक करत असताना त्यांच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीची सोनपोत त्याच पद्धतीने चोरट्यांनी चोरून नेली.


Protected Content

Play sound