यावल प्रतिनिधी । गुरूपोर्णिमानिमित्ताने येथील प्रसिध्द महर्षी व्यास मंदिरात शुक्रवारी विविध धर्मिक कार्यक्रम असून सकाळी ८ वाजता महापुजेचे आयोजन करण्यात आले आहे.
महर्षी व्यासाचे येथील भव्य मंदिर असून दर गुरूपोर्णिमेस जिल्हयासह महाराष्ट्रातील भाविक मोठया संख्येने येत असतात. मंगळवार दि.16 जुलै रोजी दिवसभर विविध धर्मिक कार्यक्रमासह, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 8 ते 10 महापूजा व दुपारी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. तसेच मंदिर संस्थान व माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. तसेच वृक्षारोपणाचा कार्यक्रम देखील होणार असून मंदिर संस्थान यांनी आवाहन केले आहे. व्यास मंदिर हे अतिप्राचिन असुन ते भारतात तीन ठिकाणी आहे. सद्याच्या येथील हडकाई-खडकाई नद्या म्हणजे पुर्वीच्या हरीता-सरीता नद्या होत. या नद्यांच्या संगमानंतर ती सुर नदि ही दक्षिण वाहीनी आहे. याच नदिच्या उंच टेकडीवर लोमेश ऋषींचा आश्रम होता. एकदा लोमेशांनी महषर्भ व्यासांचे हस्ते यज्ञाचे आयोजन केले होते. त्याचवेळेस अज्ञानवासातून पांडव हस्तीनापुराकडे परततांना लोमेश ऋषींच्या आश्रमावर आले. त्यांच्या हस्ते लोमेशांनी महर्षीना यज्ञासाठी निमंत्रीत केले होते. व महर्षी व्यासांचे हस्ते यज्ञ पार पडला. यज्ञ समाप्तीनंतर महर्षींनी काही काळ येथील भुमीत वास्तव्य केल्याचे व महाभारताची काही पर्वे लीहीली असल्याचे परीसरात बोलले जाते.
जळगाव जिल्ह्यातील यावल येथे महर्षी व्यास मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा महोत्सव आणि महायुष नया यज्ञ सोहळा 9 ते 15 डिसेंबर 1999 दरम्यान संपन्न झाला. महर्षी व्यास मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 13 डिसेंबर सोमवार रोजी झाला. प्रतिष्ठान सोहळा परमपूज्य जगद्गुरु शंकराचार्य विद्याधर भारती करवीर पीठ कोल्हापूर यांच्या हस्ते झाला. प्रमुख पाहुणे प्रवचनकार शैलेर नैमित्यराज उत्तर प्रदेश होते. महाभारताच्या वेळेस महर्षी व्यास यांचे हरिता सरिता नदीच्या तीरावर वास्तव्य होते.