Home Cities अमळनेर फटाका कारखान्यात स्फोट प्रकरणात शिरोळे कुटुंबातील तिघांना शिक्षा !

फटाका कारखान्यात स्फोट प्रकरणात शिरोळे कुटुंबातील तिघांना शिक्षा !

0
217


अमळनेर/पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | फटाका कारखान्यात स्फोट होऊन २४ कामगारांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या खटल्यात माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील तिघांना न्यायालयाने दहा वर्षांची शिक्षा सुनावल्याने खळबळ उडाली आहे.

पारोळा येथील फटाका कारखान्यात स्फोट होऊन यात होरपळून २४ कामगारांचा मृत्यू झाला होता. १० एप्रिल २००९ रोजी ही भीषण घटना घडली होती. यात कारखान्याचे मालक तथा माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे, चंद्रकांत शिरोळे व त्यांच्या पत्नी तथा माजी नगराध्यक्षा मनीषा शिरोळे यांच्यासह नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अमळनेर न्यायालयात हा खटला चालला होता. यातील ४२ पैकी तब्बल ३८ साक्षीदार फितूर झाले होते. या खटल्याचा सोमवारी निकाल लागला. यात गोविंद शिरोळे, चंद्रकांत शिरोळे आणि मनीषा शिरोळे या तिघांना दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर, या खटल्यातील अन्य सहा संशयितांची मात्र निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound