Home Cities जळगाव गोदावरी आयएमआर महाविद्यालयात फेअरवेल पार्टीचा जल्लोष

गोदावरी आयएमआर महाविद्यालयात फेअरवेल पार्टीचा जल्लोष

0
125

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (गोदावरी आयएमआर) महाविद्यालयात बीसीएच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित फेअरवेल पार्टी उत्साहात पार पडली.

या विशेष कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके, तसेच गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशनच्या संचालिका डॉ. निलीमा वारके आणि डॉ. वर्षा पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. आपल्या भाषणात डॉ. प्रशांत वारके यांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण आणि कॉर्पोरेट करिअरसाठी शुभेच्छा दिल्या आणि कॉलेजमध्ये घालवलेले तीन वर्षे आठवणीत राहतील असे सांगितले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन आणि विनोदी सादरीकरणांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत कार्यक्रमात रंगत आणली. विद्यार्थ्यांनी कॉलेजमधील आठवणींना उजाळा देत शिक्षक व सहकाऱ्यांना भावनिक निरोप दिला.

फेअरवेल कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्यांनी सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या यशस्वी भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाला विठ्ठल-रुक्मिणीची खास मूर्ती भेट दिली.

कार्यक्रमात ‘पेपर फोल्ड’, ‘साडी ड्रेसअप’, ‘गेस द कलर’ असे विविध गेम्स देखील आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समरीन व प्रेम नाले यांनी तर नियोजन व व्यवस्थापन मनस्वी परदेशी आणि राहुल सोनवणे यांनी केले.


Protected Content

Play sound