Home Cities जळगाव सावधान : पुढील दिवस भयंकर उष्णतेचे, बाहेर निघतांना काळजी घ्या !

सावधान : पुढील दिवस भयंकर उष्णतेचे, बाहेर निघतांना काळजी घ्या !

0
157


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सध्या कडक उन पडत असून येत्या दहा ते पंधरा दिवसात तापमानाचा पारा हा चढतच जाणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून यामुळे नागरिकांनी बाहेर पडतांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच तापमान सातत्याने वाढत असून आता शेवटचा आठवडा येत असतांना यात मोठी भर पडली आहे. काल जळगाव शहरासह बहुतांश तालुक्यांमध्ये तापमान हे 42 अंश सेल्सीयसपेक्षा जास्त नोंदविण्यात आले होते. यानंतर आज आणि पुढील दोन आठवड्यांमध्ये पारा मोठ्या प्रमाणात चढणार असल्याचे भाकित हवामानविषयक माहिती देणाऱ्या सर्व संकेतस्थळांनी वर्तविले आहे.

यात आज दिनांक 23 एप्रिल रोजी तापमान हे 42 ते 43 अंश सेल्सीयसच्या दरम्यान राहणार आहे. तर आगामी पाच दिवसांमध्ये पारा हा 42 अंशाच्या आसपास राहणार आहे. 29 एप्रिल नंतर मात्र तापमान प्रचंड प्रमाणात वाढणार असून तेव्हापासून दररोज तापमान 44 अंशांपेक्षा जास्त जाऊ शकते असा इशारा या संकेतस्थळांनी दिला आहे. साधारणपणे 29 एप्रिल ते 10 मे या कालखंडात प्रचंड प्रमाणात उष्मा असल्याने नागरिकांनी या कालावधीत आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

दरम्यान, सध्या सुरू असलेल्या कडक उन्हाच्या पार्श्वभूमिवर, प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. उन्हात जातांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने शरिरातील पाण्याची पातळी कायम राखण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत असे देखील सुचविण्यात आले आहे.


Protected Content

Play sound